भिगवण : पक्षीप्रेमींचा कुंभमेळा

ग्रेटर फ्लेमीनगो

मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा मी पहिल्यांदा Bhigwan ला गेलो होतो. आम्ही सकाळी साधारण साडे सहा च्या सुमारास Kumbhargaon मध्ये पोहोचलो. Bhigwan Bus Stand पासून थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूला एक वळण येते तिथून Kumbhargaon चा रास्ता सुरू होतो. तिथून साधारण सात ते आठ किलोमीटर्स गेल्यावर आपण Kumbhargaon ला पोहोचतो. पोहोचल्यावर समोरच विस्तीर्ण जलाशय दिसतो. आणि त्या दिवशी पोहोचताच एक मोठा रंगीबेरंगी पक्षी जोरजोरात आवाज करत उडत गेला. आणि समोर विविध प्रकारचे पक्षी पाण्यात विहार करत होते. ते दृश्य मी बघतच बसलो. क्षणभर मी फोटो काढायचे पण विसरलो.

हिवाळ्यात इथे परदेशी पक्ष्यांचा मेळा भरतो. आणि त्यांना बघायला पक्षी प्रेमी व छायाचित्रकार यांची खूप गर्दी असते. इथे तुम्हाला विवध प्रकारचे व विविध रंगाचे आणि विविध आकरांचे पक्षी बघायला मिळतील. हे पक्षी खूप दुरवरून भारतात येतात. फक्त हिवाळ्यात ते इथे थांबतात व नंतर ते परत निघून जातात. अर्थात जे पक्षी इथेच राहतात ते तुम्हाला बाराही महीने दिसतात.

पुण्यापासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर सोलापूर रोड वर भीगवण हे गाव लागते. तिथून जवळच कुंभारगाव आहे. तिथे उजणी नदीचे विस्तीर्ण जलाशय बघायला मिळते. त्या जलाशयात आपल्याला हे सर्व पक्षी बघायला मिळतात.

आपल्याला बोटीत बसून पाण्यात 6-7 किलोमीटर जावे लागते. रस्त्यात saegull, पानकोंबडी , विविध प्रकारची बदके दिसतात. पाण्याच्या आत गेल्यावर आपण Flamingo जवळ पोहोचतो. दुरूनच आपण त्यांना बघू शकतो. अतिशय सुंदर पक्षी आहे. दुरून त्यांचे लांब लाल रंगाचे पाय व उंच मान दिसते. ते दिवसभर पण्यातले शेवाळे खात असतात. त्यांचे पंख लाल व काळे असतात म्हणून त्यांना अग्निपंख असे देखील म्हणतात. फ्लेमीनगो चा थवा उडताना बघणे हा एक स्वर्गीय अनुभव आहे.

ज्याना पक्षी निरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे. खाली पोस्ट केलेले सर्व फोटो Kumbhargaon इथे काढलेले आहेत.

इथे जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे नोवेंबर ते फेब्रुवरी. शनिवार किंवा रविवारी जाणे टाळावे. खूप गर्दी आसते. जाण्यापूर्वी Datta Nagare यांची बोट बूक करून ठेवणे. नंबर खाली दिला आहे. माझी सूचना अशी असेल की जाताना भडक रंगाचे कपडे किंवा परफ्यूम लावून जावू नये ह्यामुळे पक्ष्या ना त्रास होतो व ते आपल्यापासून लम्ब उडून जातात.

ज्याना Flamingo ची फोटोग्राफी करावयाची आहे त्यांनी Camera आणि 150-600 mm ची लेन्स अवश्य घेऊन जावे. Flamingo लांब असल्यामुळे Telephoto लेन्स आवश्यक आहे.

Datta Nagare – Kranti Flamongo Point – +91 808776791

All d bird photographs seen above are clicked in multiple visits.

See the Flamingos in flight below. Beautiful scene.

For the list of birds seen in Bhigwan, please click the link below :

https://ebird.org/hotspot/L10895671/bird-list


Discover more from Awesomeplaces

Subscribe to get the latest posts sent to your email.

Published by Mukund Karadkhedkar

Engineer by profession and Wildlife Photographer by passion. Loves nature.

Leave a comment

Discover more from Awesomeplaces

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading