
पुण्या जवळचे पक्षी प्रेमींचे अतिशय आवडते ठिकाण म्हणजे सिंहगड व्हॅली. हिवाळ्यात येथे देशी विदेशी पक्ष्यांचा जणू मेळावाच भरतो. इथले स्टार अॅट्रॅक्शन म्हणजे Asian Paradise Flycatcher किंवा स्वर्गीय नर्तक. संपूर्ण पांढर शुभ्र रंग निमुळते शरीर ,मखमली चेहेरा व लांब शेपटी असे याचे देखणे रूप. याच्या मोहक हालचाली आणि पाण्यात सुर मारून परत झाडावर येऊन बसणे केवळ बघत राहावे.
हौशी छायाचित्रकार व पक्षी निरीक्षक यांचा हा अतिशय आवडता पक्षी आहे. कारण हा पक्षी सहसा दिसत नाही. आणि हा पक्षी अतिशय चपळ असल्यामुळे त्याचे फोटो काढणे खूप अवघड असते. सिंहगड व्हॅली मध्ये फोटोग्राफर्स आरामात बसून ह्याचे फोटो काढू शकतात. पुणे शहराच्या अतिशय जवळ असल्यामुळे इथे पोहोचणे सोपे आहे. साधारण सकाळी लवकर म्हणजे 6.0 वाजता तिथे पोहोचणे आवश्यक आहे. आपला ट्रायपॉड व कॅमेरा सेट करून तिथे वाट बघत बसावे लागते.
इथे इतर अनेक छोटे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. हयात देशी व विदेशी पक्षी सुद्धा असतात. सिंहगड व्हॅली चे वातावरण सकाळी सकाळी अतिशय आल्हाददायक असते. चहूबाजूनी डोंगर व सभोवताली भात शेती आणि आजूबाजूला नीरव शांतता. खूप छान वाटते. आशा वातावरणात रंगीबेरंगी पक्षी निरीक्षण करणे हा स्वर्गीय आनंद आहे.




हिवाळ्यात साधारण तीन महीने इथे पक्षी वास्तव्यास असतात. नोवेंबर डिसेंबर व जानेवारी पर्यन्त पक्षी असतात. त्यानंतर स्थलांतरित पक्षी निघून जातात.







व्हॅली मधी वातावरण व संभोवताल चे फोटो खाली दिसताएत. इथे शनिवार व रविवारी खूप गर्दी असते. त्यामुळे शक्यतो हे दोन दिवस सोडून जावे म्हणजे शांततेत फोटोग्राफी / bird waching करता येइल .
आपला कॅमेरा व लेन्स आणि सोबत ट्रायपॉड आवश्यक आहे. शक्यतो 100 – 400 mm Lens जवळ ठेवा कारण पक्षी खूप जवळ दिसतात. 600 mm ची Lens जरा जास्त मोठी होईल व चांगले फोटो काढत येणार नाहीत.




इथे हिवाळ्यात दिसणाऱ्या पक्ष्यांची नवे खाली दिली आहेत. याशिवाय इथे नेहमी आपल्या सभोवताली दिसणारे पक्षी देखील दिसतात.
- Asian Paradise Flycatcher – Male
- Asian Paradise Flycatcher – Female
- Tickells blue Flycatcher
- Red Whiskered Bulbul
- Black Naped Monarch OR Black Naped blue flycatcher
- Ultramarine Flycacther
- Red-breasted Flycatcher
- Green Bee eater
- Ultramarine Flycatcher
- White Throated Kingfisher
- Rose Ringed Parakeet
- Copper Smith Barbet .. .. .. .. ..
हिवाळ्यात जरूर इथे भेट द्या व पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्या.
Discover more from Awesomeplaces
Subscribe to get the latest posts sent to your email.