
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील अतिशय सुंदर व सर्वात मोठा प्रकल्प आहे. भारतात एकूण ४७ व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापेकी एक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प चंद्रपुर जिल्ह्यात स्थित आहे व नागपुर पासून दीडशे किलोमीटर वर आहे. ताडोबा हे नाव स्थानिक आदिवासींच्या देवतेच्या नावावर ठेवले आहे व अंधारी नावाची नदी तेथून वाहाते म्हणून याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात.
ताडोबाचे जंगल हे अतिशय विस्तीर्ण व घनदाट असे आहे. इथे डोंगराळ भाग व गवताळ प्रदेश असल्यामुळे जंगली जनावरांना रहाण्यास खूप उपयुक्त जागा आहे. इथे जास्त प्रमाणात बांबूची वने आढळतात. ताडोबामधील जंगलातुनच अंधारी नदी वहात असल्यामुळे इथे पाणवठ्यावर आढळणारे पक्षी सुद्धा दिसतात.
अशा या सर्वांग सुंदर जंगलात वाघ व इतर जंगली प्राणि व पक्ष्यांना बघायला मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यात सर्वात जास्त संख्येने आमच्यासारखे हौशी फोटोग्राफर असतात. आमची एकूण दहा जणांची टिम होती व सगळेच हौशी फोटोग्राफर होते.
एकूणच ताडोबाला जायचे ठरल्यापासून आम्ही सर्वजण खूपच आनंदात होतो. पण मनात एक हुरहूर होती. वाघाला जवळून बघायचे व त्याचे फोटो काढायचे हे प्रत्येक फोटोग्राफरचे स्वप्न असते. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप उत्साही होतो. त्यामुळे आमच्या प्रस्थानाचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसा तसा तयारीला जोर आला. मला अगदी शाळेच्या सहलीची आठवण झाली. कारण त्या सहलीची तयारी सुद्धा अशीच उत्साहात व अधीरपणे केली जाते.
शेवटी १४ मे हा दिवस उजाडला व आमचा प्रवास सुरु झाला. नाशिकहून निघून आम्ही १५ तारखेला चंद्रपुर येथे पोहोचलो. पुढील ४४ कि मी चा प्रवास जीपनेच केला. चंद्रपुर रेल्वे स्टेशन वरून निघून साधारण आर्धा ते पाउण तासात आम्ही जंगलात प्रवेश केला. पुढील १ ते १.५ तासाचा प्रवास आम्ही जंगलातूनच केला. अतिशय सुंदर असे जंगल बघून आमचे मन हरखून गेले. सर्वादूर उंचच उंच झाडी व सोबतीला प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज.


मुक्कामाची सोय
ताडोबा मध्ये राहण्यासाठी विविध प्रकारचे हॉटेल्स व रेसोर्टस आहेत. मी MTDC चे रेसोर्ट मध्येच राहतो. हे रिसोर्ट्स सर्वाद्र्ष्टीनी सोयीचे आहेत. कारण सफारी सकाळी लवकर सुरु होते व MTDC रिसोर्ट मोहार्ली गाते जवळच आहे.
तुम्ही जर ताडोबाला जायचे ठरवत असाल तर आधी बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंग शिवाय तुम्हाला जंगलात प्रवेश करता येत नाही. साधारण तीन महिने आधी बुकिंग संपते त्यामुळे तुम्हाला त्याआधी बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंग साठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या. Tadoba Jeep Safari Booking.
ताडोबा व्याघ्रप्रकल्प हा तीन भागांमध्ये विभागलेला आहे. या तीनही विभागांचे प्रवेशद्वार वेगळे वेगळे आहेत.
मोहार्ली झोन : ह्या झोन मध्ये वाघ दिसण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ह्या झोन मध्ये राहण्याची व्यवस्था देखील चांगली आहे त्यामुळे हा झोन पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मोहार्ली हे प्रवेशद्वार इतर दोन झोन मधून पण बघता येते.
ताडोबा झोन : निसर्ग सौंदर्य व इतर वन्यजीवांसाठी हा झोन प्रसिद्ध आहे. ह्या झोन मध्ये प्रवेश करण्यासाठी मोहार्ली नवेगाव कोलार किंवा खुतवंदा इथून पण जाता येते.
कोळसा झोन : हा झोने सुंदर जंगल व निसर्ग सौंदर्य ह्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे वन्यजीव फारसे दिसत नाहीत. ह्या झोन मध्ये प्रवेश करण्यासाठी मोहार्ली पांगडी आणि झरी इथून पण जाता येते.
मी मोहार्ली झोन मध्ये दोनदा व कोळसा झोन मध्ये एकदा जाऊन आलो आहे. दोन्ही वेळेस मला वाघोबांनी दर्शन दिले आहे.
आम्ही एकूण पाच सफारी केल्या व संपूर्ण जंगल मनसोक्तपणे फिरलो. आम्ही नशीबवान असल्यमुळे आम्हाला पहिल्याच सफरीत वाघ दिसला. सर्वांना खूपच आनंद झाला.

ताडोबातील वन्यजीव
ताडोबात बफर व कोर या क्षेत्रात एकूण ६५ ते ७० वाघ आपल्याला दिसतात. जंगल सफारी ह्या Gypsy जीप मधून किंवा मिनी बस मधून चालतात. भारतातल्या इतर ठिकाणी वाघ न दिसल्याने निराश होऊन शेवटी वन्यजीव प्रेमी ताडोबात येतात व खुश होऊन जातात. माया हि वाघीण तोडबाची राणी म्हणुन प्रसिद्ध आहे. इतर अनेक वाघ सुद्धा इथे दिसतात जसे कि गब्बर वगैरे.
ताडोबा हे आंतर्राष्ट्रीय वन्यजीव प्रेमींचे आवडीचे ठिकाण आहे. तसेच ते पक्षी निरीक्षणासाठी देखील प्रसिद्ध आहे.
- इथे सस्तन प्राणि सुद्धा खूप दिसतात जसे कि बिबट्या, जंगली अस्वल जंगली मांजर, जंगली कुत्रे, हरीण, चितळ, तरस इत्यादी.
- इथे मोठ्या प्रमाणात मगरी सुद्धा दिसतात.
- इथे अजगर घोणस अश्या प्रकारचे साप देखील दिसतात.तसेच घोरपड देखील दिसते.
- इथले पक्षी वैभव सुद्धा अत्यंत समृद्ध आहे. जसे कि Orange-headed thrush, Indian roller, lesser golden-backed woodpecker, crested honey buzzard असे अनेक पक्ष्यांच्या जाती तुम्हाला सापडतील तसेच शिकारी पक्षी सुद्धा आढळतात जसे कि crested serpent eagle and grey-headed fish eagle वगैरे.
- इथे फुलपाखराच्या साधारण ७५ प्रजाती सापडतात.

ताडोबातील पक्षी वैभव
तुमचा Gypsy driver व गाईड हा नेहमी वाघाच्या शोधात आसतो पण ताडोबा मध्ये विवध प्रकारचे खूप पक्षी आहेत. सतत आपल्याला दिसणारा पक्षी म्हणजे Indian Roller किंवा नीलकंठ व Rufous Treepie. खालील छायाचित्रात दिसणारे पक्षी सुद्धा ताडोबात तुम्ही बघू शकता.


ताडोबातील छायाचित्रणाच्या संधी
तसे ताडोबा हे वन्यजीव छायाचित्रणसाठी खूपच संधी आहेत. ताडोबाला जाण्यापूर्वी खालील गोष्टींची काळजी घ्या ;-
१. साधारणपणे फिकट रंगाचे कपडे घाला जेणेकरून तेथील जनावरांना भडक रंगाचा त्रास होणार नाही.
२. जंगलात जाताना आवश्यक तेवढे पाणी घेऊन जा.
